आठ ऑगस्ट शनिवार होता रात्रीचे दहा वाजले होते संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली समोरची एवढी गर्दी बघून प्रथम मला आश्चर्यच वाटले. सर्व तरुण मुले-मुली आणि खूप साऱ्या बस रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या होत्या. सर्वजण कुठे ना कुठे तरी चाललेले. पुनम आणि मी त्या गर्दीत आमच्या ट्रेक लीडरला शोधत होतो. तेवढ्यात त्यानी आम्हाला हात वर करून बोलावले "guy with an orange cap" विनय गुप्ता आमचे ट्रेक लीडर आणि adventuregeek चे फाउंडर. त्यांनी आम्हाला सांगितले बस कुठे आहे आणि बस चे नाव सांगितले तसे आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. ट्रेकला सर्व तरुण मुले-मुली असल्यामुळे साहजिकच बस मागच्या सीटवरून फुल होत आली होती. बॅग ठेवून आम्ही सीटवर बसलो, थोड्यावेळातच बस सुटली. आम्ही चाललो होतो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधारबन घनदाट जंगलात. तसे जंगल म्हणजे माझ्यासाठी नवीन नव्हते, बालपण गावाला झाल्यामुळे निसर्ग आम्हाला आमचा सखा सोबती वाटतो. तरीपण अंधारबन ट्रेक खूप प्रसिद्ध आहे आणि जंगल ट्रेकचा अनुभव घ्यावा, निसर्ग फिरणे, निसर्ग अनुभवणे कधीही छानच या उद्देशाने मी ही ट्रेक करायला निघालो ह...
नवीन ठिकाण फिरणे, ट्रेकिंग करणे, मला निसर्गासोबत राहणे आवडते आणि संपूर्ण जग प्रवास हे माझे स्वप्न आहे.