मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Mahuli Fort Trek - शहापूरचा माहुली गड

           दोन ते तीन आठवडे अगोदर ठरवत होतो की या वेळेला कुठे जायचं ट्रेकला. दोन तीन मित्रांना पण विचारलं होत येणार का तर त्यांनी पण किल्ल्यांची नावे सुचवली होती. पण मी ठरवले होते की ट्रेक फक्त अशा गडावर करायची ज्याला शिवकालीन इतिहास असेल आणि त्या गडावर शिवाजी महाराज थोडे दिवस का होईना पण वास्तव्यास होते.            तर तशा प्रकारे जवळच्या गडांची नावे तपासली तर माहुली किल्ला खूप छान वाटला. इतिहासाची साक्ष देणारा आणि खूप बलाढ्य असा हा किल्ला ट्रेकिंग साठी उत्तम किल्ला आहे. तसे थोडे युट्यूब चे व्हिडिओ बघून आणि थोडा इतिहास वाचून माहुली किल्ल्यावर जायचे ठरवले आणि तसे मित्रांना पण सांगितले. तर ते पण तयार झाले जायचा दिवस ठरला १४ मार्च २०२१ रविवार होता नेहमीप्रमाणे ट्रेक ठरवताना खूप मित्र तयार होते. पण प्रत्यक्षात जायच्या वेळेस फक्त तीन जण तयार झालो. मार्च महिना असल्यामुळे ऊन जास्त असणार होते तर त्याची कल्पना मी मित्रांना दिली होती.           प्रवास कसा करायचा ते अजून नक्की होत नव्हते. असे पण वाटत होते की गाडी ...

Karnala Fort Trek - माझी पहिली भटकंती कर्नाळा किल्ला

 असे मी ठरवले होते की सोलो ट्रॅव्हलिंग करायचे आणि त्याची सुरुवात 2021 या वर्षापासून झाली लहानपणापासूनच मला फिरायला खूप आवडते ते मग कुठे ही असो पण गाडीने कुठेतरी भूर जायचे आणि फिरायचे म्हणजे खूप खूप मजा यायची पण नंतर मोठा झाल्यावर मात्र तसे एकटा फिरणे झालेच नव्हते.             आणि 6 फेब्रुवारी 2021 या दिवशी ठरवले की कुठेही जायचे भले जवळ का होईना पण एकटा जायचे असे ठिकाण ठरवायला सुरुवात केली आणि कर्नाळा किल्ल्यावर जायचे ठरवले.            तसे मी 2019 पासूनच ट्रेकिंग चालू केले होते तर ट्रेकिंगचा थोडा अनुभव होता म्हणून मग सोलो ट्रॅकिंग करायचे ठरवले आणि तशी तयारी केली रात्री बॅग भरून ठेवली. पाणी बॉटल, खायला बिस्किट, खजूर, साखर, गूळ सर्व काही रात्री भरून ठेवले आणि सकाळी  साडेतीन चा गजर लावून झोपलो.          सवयीप्रमाणे सकाळी साडेतीन ला गजर झाला आणि जाग आली तशी मला दुसर्‍या दिवशी कुठे जायचे असेल तर रात्री झोपताना खूप उत्साह असतो. तर रविवारी सकाळी 7 फेब्रुवारी 2021 प्रत्यक्ष माझ्या एकटा भटकंतीला सुरुवात...